breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोना लसीचे डोस ‘सीरम’मधून रवाना; ‘कोव्हिशिल्ड’चे देशभरात वितरण सुरू

पुणे – संपूर्ण जग कोरोना लसीच्या प्रतीक्षेत असताना ‘कोव्हिशिल्ड’ या भारतातील पहिल्या वहिल्या लसीचे डोस आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे 5 वाजता विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी लसींचे डोस इतर शहरांमध्ये रवाना होण्यापूर्वी लसीचे डोस कंटेनरमध्ये भरल्यानंतर त्याची नारळ फोडून पूजा करण्यात आली. या पुजेचा मान पुणे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना मिळाला. त्यांनी हार, फुलं वाहत कंटेनरची पूजा केली. यावर बोलताना माझ्यासाठी हा मोठा मान असल्याचे नम्रता पाटील यांनी म्हटले.

वाचा :-मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाल्याला एनसीबीकडून अटक

सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या लसीचे डोस काल (11 जानेवारी) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आज पुणे विमानतळावरून ही लस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यात अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कर्नाल, कोलकाता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. आज पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी ८ वाजता नियोजित आहे. ८ फ्लाईटपैकी २ फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईटपैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकाता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे.

दरम्यान, भारत सरकारने लस खरेदीसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली होती. त्यानुसार सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विकसित केलेल्या या लसीची निर्मिती पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूटने केली आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असेल, असे सीरमच्या अधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

महत्त्वाचे म्हणजे सीरमची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सीन’ या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर कोव्हिशिल्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button