breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रोहित पवार विरूद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद पेटणार; प्रकरण काय?

मुंबई | तलाठी भरती संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे. तलाठी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून गेले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचाही संशय व्यक्त करत एका जागेसाठी २५ लाख रुपयांची वसूली झाल्याचे धक्कादायक आरोप केले होते.

तसेच राधाकृष्ण विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना २०० पैकी २१४ गुण ते देणार का? आणि कुणालाही डॉक्टर करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपांवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हणले आहे.

हेही वाचा   –    उत्सव रामभक्तांचा: राम मंदिर राष्ट्रार्पण दिनी शासकीय सुट्टी जाहीर करा!

तसेच जी मुलं गुणवत्ता यादीत आली त्यांच्यावर अन्याय का करायचा? असा सवाल उपस्थित करत विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून खोटा प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हणले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button