breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘अमरावतीची जागा भाजपाच लढवणार’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणवार अशी चर्चा सुरू आहे. तसंच त्यांचा लवकरच भाजपात प्रवेश होऊ शकतो अशीही चर्चा आहे. अशातच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अमरावतीची जागा भाजपाच लढवणार, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपाच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी घोषित झाली आहे त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या तयारीचा आढावा आम्ही घेत आहोत. अकोल्यात आहोत, वर्धा या ठिकाणी आम्ही जात आहोत. जाहीर प्रचाराच्या आधीच्या व्यवस्था लावणं हे आम्ही करतो आहोत. अकोला आणि वाशिमच्या टीमने अतिशय चांगली तयारी केली आहे. बुथ पर्यंत चांगली रचना केली आहे. आम्ही सगळं नियोजन केलं आहे.

हेही वाचा    –    चेन्नईची धुरा यंदा मराठी माणसाच्या हातात, धोनी कर्णधार पदावरून पायउतार 

अमरावतीची जागा भाजपा लढणार, जो उमेदवार असेल तो भाजपाच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा या विद्यमान खासदार आहेत. नवनीत राणा पाच वर्षे भाजपासह आहेत. लोकसभेत त्यांनी पाच वर्षे अत्यंत ताकदीने भाजपाची आणि मोदींची बाजू मांडली आहे. मात्र अंतिम निर्णय आमची निवडणूक समिती घेणार आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही जास्त काही सांगू शकत नाही. जिथे भाजपा जागा लढवणार आहे तिथे महायुती भाजपासाठी प्रचार करेल. जी जागा शिवसेनेला, राष्ट्रवादीला असेल तिथे आम्ही त्यांचा प्रचार करु हे ठरलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हर्षवर्धन पाटील यांनी माझी भेट घेतली. मात्र ते नाराज नाहीत. हर्षवर्धन पाटील यांनी काही मुद्दे मांडले होते. स्थानिक पातळीसमोरचे काही प्रश्न होते. मी त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. हर्षवर्धन पाटील भाजपात आल्यापासून ते समर्पित भावनेने काम करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं नेतृत्व मोठं झालं पाहिजे ही भाजपाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते आमच्या उमेदवाराचं काम ताकदीने करतील असा मला विश्वास आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button