breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: संसद अधिवेशनापूर्वी कोरोनाची चाचणी, 30 टक्के खासदार आणि दोन मंत्री निघाले पॉझिटिव्ह!

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी सर्वच खासदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात जवळपास 30 टक्के खासदारांचे रिझल्ट हे पॉझिटिव्ह आले असून त्यात दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. तर या आधीच अनेक खासदार आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यातले अनेक जण कोरोनामुक्तही झाले आहेत. त्यांना आता क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलेलं आहे. संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही कोविड चाचणी करण्यात आली. कोरोना उद्रेकानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे अधिवेशनात सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत.

खासदारांच्या आसन व्यवस्थेपासून ते कामकाजापर्यंत प्रत्येक गोष्टी बदललेली आहे. अनेक खासदारांच्या चाचणीचे रिझल्ट अजुन मिळालेले नाही अशी नाराजी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी व्यक्त केलेली आहे. संसदेत दररोज फक्त 4 तास कामकाज होणार आहे. जवळपास सर्वच कामकाज डिजिटल पद्धतीने होणार असून प्रश्नांची उत्तरही Online पद्धतीनेच दिली जाणार आहेत. 14 सप्टेंबरपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 1 ऑक्टोबरपर्यंत चालेल. या काळात, सलग 18 बैठका पार पडती, ज्यामध्ये 45 विधेयक आणि 11 अध्यादेश आणले जातील. यानंतर संसदेचं कामकाज सुरू करण्यात येईल अशी शक्यता आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आठवड्याच्या 7 ही दिवशी होईल. यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नाही. दररोज 4 तास दोन्ही सत्रांचं कामकाज सुरू असेल. तर अधिवेशनाता पहिला दिवस वगळता उर्वरित राज्यसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पार पडणार, तर लोकसभा संध्याकाळी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत असेल अशी माहिती देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button