breaking-newsराष्ट्रिय

टिव्ही, फ्रिजवरील “जीएसटी’कमी केला

  • राख्या आणि सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमधून वगळले

नवी दिल्ली – वस्तू आणि सेवा कर अर्थात “जीएसटी’संचालक परिषदेच्या 28 व्या बैठकीमध्ये दैनंदिन वापरातील टिव्ही, वॉशिंग मशिन आणि रेफिजरेटरसारख्या वस्तूंवरील “जीएसटी’ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आजच्या बैठकीतील महत्वाचा निर्णय म्हणजे सॅनिटरी नॅपकीन, हस्तमागाच्या छोट्या वस्तू आणि राख्या “जीएसटी’मधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी करण्यात यावे आणि सॅनिटरी नॅपकीनना “जीएसटी’मधून वगळण्यात यावे, अशी मागणी वर्षभरापासून “जीएसटी’संचालक परिषदेकडे करण्यात येत होती. त्यानुसार सॅनिटरी नॅपकीनवरील “जीएसटी’ 12 टक्‍क्‍यांवरून शून्य टक्के करण्यात आला आहे, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याशिवाय चपला, छोटे टिव्ही, वॉटर हिटर, इलेक्‍ट्रीक इस्त्री, रेफ्रिजरेटर, लिथियमियन बॅटरी, हेअर ड्रायर, व्हॅक्‍युम क्‍लीनर, फूड अप्लायन्सेस आणि इथेनॉल या वस्तूंवरील “जीएसटी’ कमी करण्यात आला आहे. बांबू फ्लोअरिंग वरचा 18 टक्‍क्‍यांचा कर दर 12 टक्के करण्यात आला.

हातमागाच्या छोट्या वस्तू आणि राखीला “जीएसटी’तून वगळण्यात आले आहे. इथेनॉलवरील कर 5 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. कोटा दगड, खडी आणि त्याच प्रकारच्या स्थानिक दगडांवरील “जीएसटी’ 18 टक्‍क्‍यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. श्रेणीनुसार बदल टाळण्यासाठी हे दगड एकाच श्रेणीत आणण्यात आले आहेत. 5 टक्के “जीएसटी’ हा 500 रुपये ते 1000 रुपयांच्या पादत्राणांना लागू होणार आहे.

मध्यम वर्गीयांकडून वापर होणाऱ्या 17 वस्तूंवरील “जीएसटी’ 28 टक्‍क्‍यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. यामध्ये रंग, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, व्हॅक्‍युम क्‍लीनर, स्टोअरेज वॉटर हीटर, 68 सेंमी पर्यंतचे टिव्ही आदींचा समावेश आहे. “जीएसटी’संचालक परिषदेची पुढील बैठक 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button