breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

फळांच्या व भाज्यांच्या रंगावरून समजतात त्यामधील गुणधर्म!

Fruits and Vegetables : आरोग्यासाठी कोणती फळे किंवा पालेभाज्या खाणे फायदेशीर जास्त फायदेशीर असतात? तसेच फळांचे व पालेभाज्यांचे गुणधर्म काय आहेत, तर फळांच्या व पालेभाज्यांच्या रंगावरून त्याचे गुणधर्म ठरले जाते. तर आज आपण जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या फळांमध्ये कोणते गुणधर्म असतात.

हिरवा रंग : हिरव्या पालेभाज्यांचे आहारात सर्वात जास्त महत्व आहे. हिरव्या रंगाच्या भाज्यांमध्ये व फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, फोलेट, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि के असतात.जे की ते शरीरासाठी फार उपयुक्त असतात. हिरव्या रुग्णाच्या भाज्यांमध्ये काही प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स म्हणजे आयसोथियोसायनेट, ल्युटीन, झेक्सॅन्थिन, आयसोफ्लाव्होन आणि ईजीसीजी असतात. तज्ज्ञांच्या मते शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. व डोळ्यांच्या सामान्य असल्यास कमी होतात. हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, शेपू, भोपळा, कारलं, कोबी, ब्रोकोली यांचा समावेश करावा.

जांभळा रंग : जांभळ्या रंगामध्ये विविध फळांचा व पालेभाज्यांचा होतो. जांभळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये पोषक घटकांव्यतिरिक्त अँथोसायनिन्स आढळते. अँथोसायनिन्स हे कॅन्सरविरोधी काम करते. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. तसेच जांभळ्या रंगाच्या पदार्थाचे सेवन केल्यास रक्तवहिन्यासंबंधीच्या समस्या कमी होतात. त्यामुळे स्मरणशक्तीही सुधारते. जांभळा रंग हा एक समृद्ध अँटिऑक्सिडेंट आहे. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि कर्करोगासहअनेक रोगांपासून सुटका होण्यास मदत होते. जांभळ्या रंगाच्या फळांमध्ये व भाज्यांमध्ये वांगी, काळी द्राक्षे, चेरी, ब्ल्यू बेरी, गुसबेरी, स्ट्रॉबेरी इत्यादींचा समावेश होतो. त्यामुळे जांभळ्या रंगाच्या पदार्थांचा आहारात समावेश नक्की करा.

हेही वाचा – युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना ‘लोकसेवा’तर्फे पुस्तकांचा मोफत संच वाटप 

लाल रंग : शरीरात लाल रंगाचे कार्य सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे लाल रंगाच्या भाज्यांचे व फळांचे आहारात सेवन करणे महत्वाचे मानले जाते. मुख्यतः लाल फळे आणि भाज्या हृदयाचे रक्षण करतात. बहुतेक लाल रंगाच्या फळे आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे एथेरोस्क्लेरोसिस, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.तसेच लाल रंगाच्या पदार्थामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो व हृदयरोग आणि मेंदूचे कार्य सुधारते. तसेच लाल रंगाची फळे आणि भाज्या अॅनिमिया असणाऱ्या रुग्णांसाठी सुपरफूड म्हणून मानले जाते. लाल रंगाच्या फळांमध्ये व पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, लाल कोबी, बीट्स, लाल द्राक्षे, स्ट्रॉबेरी, टरबूज, चेरी, रास्पबेरी, डाळिंब, क्रॅनबेरी यांचा समावेश होतो.

केशरी आणि पिवळा : केशरी आणि पिवळी रंगाच्या भाज्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. या दोन्ही रंगाच्या भाज्यांचे व फळांचे कार्य हे शरीरात महत्वाचे आहे. या रंगाच्या भाज्या व फळे मज्जासंस्थेचे रक्षण करतात आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारतात. सर्वात महत्वचाहे म्हणजे केशरी आणि पिवळी रंगाच्या भाज्या हृदयविकार आजारापासून सुटका करतात. तसेच त्वचेचे देखील आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर आणि हाडे मजबूत करायची असतील तर तुम्ही केशरी आणि पिवळी रंगाच्या भाज्या व फळांचा आहारात समावेश करायला हवा. केशरी आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थांमध्ये कॅरोटिनोइड्स, ल्युटीन, झेक्सॅन्थिन, व्हायोला-झेंथिन आणि इतर अनेक फायटोन्यूट्रिएंट्स असतात. यामध्ये संत्रा, गाजर, भोपळा, गोड कॉर्न, रताळे, पिवळी मिरी, पिवळे टोमॅटो, जर्दाळू, द्राक्ष, पीच, आंबा, पपई, नाशपाती, अननस या फळांचा समावेश होतो.

तपकिरी आणि पांढरा : पांढरी आणि तपकिरी रंगाच्या फळे आणि भाज्यांमध्ये पोटॅशियम, फायबर, बीटा-ग्लुकन्स, लिग्नॅन्स आणि एपिगॅलोकेटचिन गॅलेट (EGCG) जास्त असतात. ही पोषकतत्त्वे हृदयाचे आरोग्य, कर्करोगापासून बचाव करतात. तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवतात. या रंगाच्या पदार्थांचे सेवन केल्याने पचनसंस्थेचे आरोग्य चांगले होते आणि चयापचय क्रिया देखील चांगली होती. या रंगाच्या भाज्यांमध्ये अँटी-बॅक्टेरियल व अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. तसेच यामधील घटक हाडांसाठी फायदेशीर मानले जाते. पांढरी आणि तपकिरी रंगाच्या फळांमध्ये व भाज्यांमध्ये फुलकोबी, लसूण, आलं, सलगम नावाच कंद व त्याचे झाड, पार्सनिप्स, बटाटे, कांदे, मशरूम या पदार्थांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button