breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

स्थायी समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या; शिवसेना आक्रमक

पिंपरी |

स्थायी समिती बरखास्त करा , नहीं चलेगी नहीं चलेगी , टक्केवारी नहीं चलेगी , ना लाज ना शिष्टाचार . अशा घोषणा देत पिंपरी चिंचवड महापालिका भवन शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले . जामिनावर बाहेर असलेल्या समिती अध्यक्ष अॅड . नितीन लांडगे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत महापौर व समितीच्या दालनाबाहेर बुधवारी ( दि .२५ ) ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी आमदार अॅड . गौतम चाबुकस्वार , शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक अॅड . सचिन भोसले , सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, आजी- माजी नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.

स्थायी समिती कार्यालयावर बुधवारी ( दि . १८ ) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धापा टाकून अध्यक्ष अॅड . लांडगे यांच्यासह ५ जणांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विरोधक असलेली शिवसेना आक्रमक झाली आहे . शिवसेनेने आंदोलन करत स्थायी समिती अध्यक्षांच्या राजीनामाची मागणी केली. महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीमध्ये भाजपने ‘ ना भय , ना भ्रष्टाचार ‘ असे म्हणत सत्ता घेतली. मात्र, गेली साडेचार वर्ष फक्त ‘ ना लाज , ना शिष्टाचार ‘ असाच कारभार भाजपने केल्याची टीका आंदोनावेळी करण्यात आली .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button