breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईव्यापार

२२ जानेवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यालयांना सुट्टी

मुंबई : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने राम लल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. या काळात रिलायन्सची देशभरातील कार्यालये पूर्णपणे बंद राहतील. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. डिसेंबर तिमाहीचे निकाल कंपनीने शुक्रवारी जाहीर केले.

रिलायन्सने डिसेंबर तिमाही निकालांमध्ये ११ टक्क्यांच्या वाढीसह १९,६४१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते १७,७०६ कोटी रुपये होते. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने २.४८ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे. या कालावधीत, कंपनीचा EBITDA देखील १७ टक्क्यांनी वाढला आहे आणि तो ४४,६७८ कोटी रुपये आहे.

२२ जानेवारीला राम लल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त शेअर बाजारही बंद राहणार आहेत. त्याऐवजी शनिवारी ट्रेडिंग सत्र ठेवण्यात आले आहे. या दिवशी बाजारात सामान्य दिवसांप्रमाणेच व्यवहार होईल. शेअर्सच्या खरेदी-विक्रीसह डेरिव्हेटिव्हजमध्ये व्यवहार होईल.

हेही वाचा – अजित पवारांच्या ‘त्या’ आरोपावर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, अजित पवार कुठून..

शेअर बाजारासोबतच आरबीआयनेही २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी आरबीआयची सर्व कार्यालये दिवसभर बंद राहतील. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारची सर्व कार्यालयेही रामललाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी अर्धा दिवस बंद राहणार आहेत.

२२ जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलला तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह देशातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button