breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

भुशी धरणाच्या पायऱ्यांवर अडकलेल्या तरुणांना वाचवले, धरण रस्ता बंद

पिंपरी, (महाईन्यूज) – पावसाचा जोर वाढत चालला असतानाच लोणावळ्यातील पर्यटन स्थळांनी हिरवा शालू पांघरला आहे. धबधबे आकार घेत आहेत. दुथडी भरून नद्या वाहू लागल्या आहेत. त्यामुळे लोणावळ्यात पर्यटकांची रांग लागली आहे. भुशी धरण परिसरात पर्यटक आले असताना दोनजण पाण्याच्या प्रवाहात अडकले होते. भीतीने त्यांची गाळण उडाली होती. या सगळ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात लोणावळा पोलिसांना यश आलं आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, पर्यटकांनी स्वतः ची काळजी घेणे गरजेचे असून आज भुशी धरणाकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लोणावळा शहरात पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिसरातील नद्या नाल्या एक झाल्या आहेत. भुशी धरण हे सर्वांचे आवडीचे पर्यटनस्थळ असून त्यात चिंब भिजण्याचा आनंद अनेक नागरिक घेतात. शुक्रवारी काही हौशी पर्यटक हे भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसाचा आनंद घेत होते. तेवढ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि हे तरुण भुशी धरणाच्या पायऱ्यांवर अडकले.  या तरुणांना वाचवण्यासाठी स्थानिक आणि पोलिसांकडे याचना करत होते. तेव्हा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, आर.व्ही.मुंडे, आणि पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांनी आपला जीव धोक्यात घालून तरुणांना वाचविण्यात यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button