breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एकही दिव्यांग शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत महापालिकेच्या व शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, या योजनांपासून कोणीही वंचित रहाता कामा नये, यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित जागतिक दिव्यांग दिन या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, ज्याला वाचता येते त्याला साक्षर म्हणतात, ज्याला वाचता येत नाही, त्याला निरक्षर म्हणतात. परंतु, ज्याला ऐकमेकांच्या भावना कळतात, त्यालाच खरा माणूस म्हणतात. कोणत्याही योजनेपासून व कोणत्याही सोई-सुविधेपासून दिव्यांगांना वंचित राहू दिले जाणार नाही. असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पंगू असणे ही मानसिकता आहे. कोणीही शरीराने अपंग होऊ शकत नाही. अपंगत्व हे मानसिकतेने येत असते. ज्या दिवशी ही मानसिकता व पंगूपण दूर होईल त्या दिवशी आपण प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो व येणाऱ्या अडचणींवर मात करु शकतो. विविध माध्यमांचा वापर करुन आपणही सक्षम होऊ शकता. आपल्या उन्नतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका कटीबद्ध आहे.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, दिव्यांगातून उद्योजक निर्माण करण्यासाठी व शासनाच्या योजना शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल.

यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रमुख व्याख्याते रेवन्ना कर्डीले, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले तर आभार अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी मांडले.

उल्लेखनीय दिव्यांगांचा सन्मान

राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत दिव्यांग व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये प्रेरणा सहाणे (दिक्षीत), जयश्री राजगोपालन, विलास मोरे, पृथ्वीराज इंगळे, सुजाता पवार, वसंत भिसेकर, शामकांत नांगरे, विश्वनाथ घमोडे, सुनंदा डावखर, दिनेश मालशे, मोहन डिगोळे, मंगेश पुंडे, महेंद्र साकळे, योगिता तांबे, भानू नाडर आदींचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button