breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

मुंबई – पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडले असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीन-चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातदेखील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. 15 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात काल म्हणजेच 12 जुलैपर्यंत 360.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. 40 दिवसांत मान्सूनने संपूर्ण भारताचा प्रवास केला. दिल्लीत तब्बल 19 वर्षांनंतर मान्सून उशिराने दाखल झाला असून याआधी 2002 साली मान्सून 19 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button