breaking-newsआंतरराष्टीय

दुबईचा आणखी एक विश्व विक्रम, जगातील सर्वात खोल तरण तलाव

दुबई – जगातील सर्वात उंच इमारत आणि सर्वात वेगवान रोलरकोस्टर असलेल्या दुबईत आता जगातील सर्वात खोल तरण तलाव बांधण्यात आला आहे. ६० मीटर खोल या जलतरण तलावाचे नाव ‘डीप ड्राईव्ह’ असे आहे. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे.

या तलावात १ कोटी ४० लाख लिटर ताजे पाणी सामावू शकते. ते ६ ऑलिंम्पिक जलतरण तलावांत इतके आहे, अशी माहिती ‘डीप ड्राईव्ह’चे संचालक जारोद जाबलोन्स्की यांनी दिली.

समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या शिंपल्याप्रमाणे या जलतरण तलावाची रचना आहे. पाण्यात खोलवर जाऊन मोती काढण्याच्या परंपरेला यातून संयुक्त अरब अमिरातीने गौरवले आहे. जगातील सर्वात उंच इमारत आणि रोलरकोस्टर अशी आश्चर्य असलेल्या दुबईच्या शिरपेचात या खोल जलतरण तलावामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या तलावाचे उद्घाटन नुकतेच झाले. एक्सपो २०२० चे आयोजन प्रलंबित आहे. ते येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या जलतरण तलावाचे ताशी तिकीट १३५ ते ४१० डॉलर आहे. डीप ड्राईव्हमध्ये प्रकाश आणि संगीताच्या मदतीने पाण्याखालील खेळ खेळता येतात.

मनोरंजन आणि सुरक्षिततेसाठी तलावात ५० कॅमेरेही बसवले आहेत. सर्वसामान्यांसाठी हा तलाव लवकरच खुला होईल, असे जारोद जाबलोन्स्की यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button