ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ खडसेंना दिलासा: फडणवीस सरकारने दाबून ठेवलेला झोटिंग समिती अहवाल सापडला

मुंबई: माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे विद्यमान नेते एकनाथ खडसे यांच्यावरील भोसरी येथील कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीचा अहवाल तब्बल दीड वर्षानंतर आघाडी सरकारला सापडला. आता या अहवालावर काय कार्यवाही करायची याचा निर्णय आघाडीचे नेते एकमताने घेणार आहेत.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडे न्या. झोटिंग समितीचा अहवाल मागितला होता. मात्र, गेली दीड वर्ष अहवाल सापडत नसल्याची माहिती विभागाकडून पवार यांना दिली जात होती. त्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंगळवारी अजित पवार यांची भेट घेऊन झोटिंग समितीचा अहवाल सापडला असून तो आजच मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची माहिती दिली.

 

अहवालाचा शोध थांबल्याने आता आघाडी सरकारने अहवालावर निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडी या प्रकरणाची चौकशी करत असून खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. शिवाय ईडीने खडसेंचीही चौकशी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button