breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

सोलापूर-धुळे महामार्गवर इंधनाच्या टँकरचा स्फोट

बीड | सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी भीषण अपघात झाला आहे. इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन त्यात ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गवर बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात बुधवारी सकळी 11 च्या सुमारास इंधनाचा टँकर पलटी झाला. टँकर पलटी होताच त्याने पेट घेतला. यावेळी इंधनाचा स्फोट झाला यात ड्रायव्हरचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर भाजला गेला आहे. त्याला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

स्फोटानंतर आगीचे आणि धुराचे लोट आकाशात पसरले होते. साधारण 2 किलोमीटर वरून ते दिसत होते. या आगीमुळे परिसरात डोंगरावरील गवत पेटले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्र मिळवलं. ऐन घाटात हा प्रकार झाल्याने काहीकाळ वाहतूक थांबवण्यात आली होती. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, यात एकाचा भाजून अक्षरशः कोळसा झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. बीड येथील मांजरसुंबा घाटात इंधनाच्या टँकरला अपघात झाला. त्यानंतर टँकरने पेट घेतल्याने त्याचा स्फोट झाला. त्यामुळे अगीच्या ज्वाला उठल्या होत्या. गाडीत एक जण जळून खाक झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पडलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button