breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम बदलणार, पाहा काय होणार बदल

RBI New Rule : क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आता तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड कुठेही वापरू शकणार. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले की विशिष्ट नेटवर्कसाठी कार्ड जारी केले जाऊ नये आणि ते सर्व नेटवर्कला वापरण्याची परवानगी दिली जावी. या संदर्भात कार्डच्या नियमांमध्ये (RBI New Rule) बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी केली जाऊ शकते. या प्रस्तावर आरबीआयने सर्वसामान्यांचे मत मागितले आहे.

रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड संदर्भात आरबीआय नवीन नियम लागू करू शकते. यामागचे मुख्य कारण म्हणजे मास्टर, व्हिसा सारख्या आघाडीच्या कार्ड नेटवर्कमध्ये रुपे कार्डची एंट्री नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटले की सध्या कार्ड नेटवर्क आणि कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या ग्राहकांचे हित पूर्णपणे विचारात घेत नाहीत.

हेही वाचा – खुशखबर! ‘या’ कर्जाच्या रकमेत वाढ, हजारो लाभार्थ्यांना मिळणार कर्ज

व्यापारी आणि कार्ड जारी करणारी कंपनी यांच्यातील व्यवहार सुलभ करणे ही कार्ड नेटवर्कची भूमिका असली पाहिजे. कोणत्याही कार्ड नेटवर्कसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, ज्यासाठी शुल्क वसूल केले जाते. कार्ड जारीकर्ते कोणत्याही एका नेटवर्कशी संबंधित नसावेत, जेणेकरून इतर कार्ड नेटवर्कचे ग्राहक ते वापरू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button