breaking-newsआंतरराष्टीय

भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान दुर्घटनाग्रस्त

भारतीय हवाई दलाचं मिग-२१ दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. सराव सुरु असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे मिग-२१ प्रशिक्षक विमान असून यावेळी विमानात ग्रुप कॅप्टन आणि स्क्वॉडन लिडर वैमानिक म्हणून उपस्थित होते. मिग-२१ विमानाने ग्वालियर हवाई तळावरुन उड्डाण केलं होतं. यानंतर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

२०१६ पासून भारतीय हवाई दलाने अपघात आणि दुर्घटनांमध्ये एकूण २७ विमानं गमावली आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button