breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एक देश, एकाच दिवशी पगार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना

नवी दिल्ली | देशभरातील नियमित वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी (फॉर्मल सेक्‍टर) केंद्र सरकारने एक महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. या योजनेमुळे भविष्यात देशातील सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी शुक्रवारी (16 नोव्हेंबर) ‘वन नेशन, वन पे डे सिस्टम’ {One Nation, One Pay Day System} योजनेची माहिती दिली. ते ‘सुरक्षा नेतृत्व संमेलन 2019’ येथे बोलत होते.

संतोष गंगवार म्हणाले, “संपूर्ण देशातील सर्व क्षेत्रात कामगारांना वेळेवर पगार मिळावा यासाठी प्रत्येक महिन्यासाठी एक विशिष्ट पगाराचा दिवस असायला हवा. याबाबतचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. अशाचप्रकारे आम्ही सर्व क्षेत्रांसाठी किमान वेतन कायद्यावरही काम करत आहोत.” 2014 मध्ये देशाचा कारभार स्वीकारल्यानंतर मोदी सरकार सातत्याने कामगार कायद्यांमध्ये सुधारण करत आहे. आम्ही 44 किचकट कामगार कायद्यांमध्ये सुधारणेसाठी पाऊलं उचलली आहेत, असंही गंगवार यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button