breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

भारत गौरव ट्रेन पुण्याहून रवाना; रावसाहेब दानवेंनी दाखवला हिरवा झेंडा

कोलकत्ता, प्रयागराज, काशीसह अन्य भारतातील शहरांमध्ये जाणार

पुणे : केंद्र सरकारच्या देखो अपना देश आणि एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भारत गौरव ट्रेन आज पुण्यावरून रवाना झाली आहे. या ट्रेनला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा भारत गौरव ट्रेनला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला.

पुण्यावरून रवाना झालेली भारत गौरव ट्रेन कोलकत्ता, प्रयागराज, काशीसह अन्य भारतातील शहरांमध्ये जाणार आहे. ही ट्रेन जवळपास ९ रात्र आणि १० दिवस चालणार आहे. या ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसेच IRCTC ने या टूरसाठी सर्वसाधारणासाठी १५,९०० रूपये, कन्फर्टसाठी २७,९०० रूपये आणि डिलक्ससाठी ३३,३०० रूपये अशी ती पॅकेजेस जाहीर केली आहेत.

दरम्यान, पुण्याहून पुढील भारत गौरव ट्रेन ११ मे रोजी रवाना होईल. ती उत्तर भारतातील आग्र, अमृतसह, हरिद्वार, मथुरा, ऋषीकेश, उज्जैन आणि वैष्णो देवी मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळे असलेल्या शहरांत जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button