breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

कचरा संकलनाच्या नावाखाली शहरवासीयांची लूट!

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची टीका; उपयोगकर्ता शुल्क आकारणीच्या निर्णयाला विरोध

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली संपूर्ण शहरातील मिळकतधारकांच्या घरपट्टी पत्रकामध्ये २०१९-२० चा उपयोगकर्ता शुल्क थकबाकी म्हणून ५४० रु मिळकतकराच्या बिलात ही रक्कम जमा केली असून, ती वसूल देखील करीत आहे. तसेच दरवर्षीच्या कर मिळकत पत्रिकेमध्ये अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार आहे हे, अन्यायकारक असून तत्काळ हा निर्णय रद्द करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, उपयोगकर्ता शुल्कचा नावाखाली शहरवासीयांची चाललेली लूट थांबवावी व त्याबाबत काढलेला आदेश त्वरित रद्द करण्यात यावा. मुळातच अशा कोणत्याही प्रकारचा कचरा संकलनाच्या नावाखाली उपयोगकर्ता शुल्क मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी सारख्या महानगरपालिका घेत नाही मग आपल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस अश्या प्रकारचा उपयोगकर्ता शुल्क घेण्याची एवढी घाई का..? शहरातील नागरिक कररूपातून लाखो रुपये कर महानगरपालिकेस भरतात. ते भरून सुद्धा त्यांना महानगरपालिका पुरेशा मुलभूत सोयी-सुविधा देत नाही. तसेच प्रशासक राजवटीच्या नावाखाली मनपा विविध कर व शुल्काच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनची लूट करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button