ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

मावळात लोकसभा उमेदवारीवरून युतीत रंगला महाकलगीतुरा

श्रीरंग बारणे यांनी आपल्या नऊ वर्षाच्या कामाचा हिशोब जनतेला द्यावा; मावळचे आमदार सुनील शेळके कडाडले!

खासदार श्रीरंग बारणे जवाब दो!!

कोण रवी भेगडे? हम साथ-साथ है बोलले आणि पळून गेले!

तळेगाव दाभाडेः खासदार बारणे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यापूर्वी आपल्या नऊ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा द्यावा. मावळ तालुक्यात काय कामे आणली, कोणत्या मोठ्या योजना आणल्या, किती निधी आणला? हे जनतेसमोर मांडावे, असे आव्हान देत आमदार सुनील शेळकेंनी अप्रत्यक्ष श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोधच केला. मोदी लाटेवर उमेदवारी मागणे आणि निवडून येणे आता सोपे राहिलेले नाही, असे सांगत त्यांनी बारणेंना डिवचले. तसेच दोन्ही टर्मला ते मोदी करिष्म्यामुळे निवडून आले, हे त्यांनी आवर्जून सांगितले.

मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबत, राजकीय घडामोडी, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत ज्या काही चर्चा, तर्क-वितर्क लढवले जात आहेत, याची माहिती, तसेच तालुक्यात सुरू असलेल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे अपडेट, सध्या या कामांचा तपशील मावळवासियांना माहिती व्हावा. तसेच स्थानिक नागरिकांचे प्रश्न, तळेगाव, लोणावळा, देहू, कँन्टोन्मेंट बोर्डासंधर्भातील प्रश्न तसेच तळेगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांची 16 कोटी रुपयांची प्रस्तावित कामे सुरू करण्याबाबतची माहिती आ. शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मावळ तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील यांना आवाहन करण्यात आले. आमदारकीचा जो काही कार्यकाळ शिल्लक आहे. या कार्यकाळात जी काही आश्वासने दिली होती ही आश्वासने या 10 महिन्याच्या कालावधीत मार्गी लावण्यात येतील. आपापल्या गावातील अर्धवट विकासकामांची माहिती द्यावी. जी काही कामे शिल्लक आहेत ती 100 टक्के पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती देण्याच्या हेतूने मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

शिवसेना शिंदे गटाचे मावळचे दोन टर्मचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हॅट्ट्रिकसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला महायुतीकडून आपली उमेदवारी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानंतर तेथून माजी मंत्री भाजपचे बाळा भेगडे यांनीही सोमवारी (ता.27) शड्डू ठोकत लढण्याची तयारी दाखवली, तर आज (ता.28) राष्ट्रवादी कॉंग्रेसने (अजित पवार गट) या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांचा वेळ असताना तसेच ती जाहीर झालेली नसतानाही मावळात उमेदवारीवरून युतीत महाकलगीतुरा रंगला आहे.

युतीतील तिन्ही पक्षांनी मावळवर क्लेम केल्याने तेथील 2024 च्या लोकसभेच्या उमेदवारीचा मोठा पेच 2023 लाच निर्माण झाला आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज पत्रकार परिषद घेत ही जागा पक्षाला मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. या मतदारसंघात पक्षाची मोठी ताकद असल्याने ती मिळावी म्हणून आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह युतीच्या नेत्यांपुढे ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी मी इथे (विधानसभेला) समाधानी असून, लोकसभा लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीरंग बारणेंनी अगोदरच आपली उमेदवारी जाहीर करून टाकली आहे, याकडे आमदार शेळके यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आ. शेळके म्हणाले की, उमेदवारी मिळाली म्हणजे निवडून आलो असे होत नाही. तसे स्वप्नही त्यांनी पाहू नयेत. मोदी लाटेत आले. या वेळी पुन्हा लॉटरी लागेल हा संभ्रम काढून टाकावा, असा टोला आमदार शेळके यांनी लगावला. मावळ तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादीची मावळ लोकसभेत मोठी ताकद आहे. थोडक्यात काय तर मावळ लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड असल्याने ही जागा पक्षाला मिळावी हा आमचा हट्ट आहे, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.

तळेगाव शहरातील नागरिकांना आवाहन करताना आ. शेळके म्हणाले की, तळेगावात राहत असताना सर्वजण आपण टॅक्स भरतो. माजी नगरसेवक नगराध्यक्ष, इतर लोकप्रतिनिधींनी, माजी आमदारांनी जबाबदारी झटकून टाकता कामा नये, लोणावळा नगरपालिकेच्या कारभाराबाबत येथील नागरीक नाराज आहेत. सरनाईक सारखा अधिकारी नगरपरिषदेत चांगले काम करत असताना त्या अधिकाऱ्याची बदली का केली. हा खासदार बारणे यांना सवाल आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सहजासहजी सुटत नाहीत. मुख्याधीकाऱ्यांना त्यांना त्यांचा पगार मिळतोय. जनतेच्या समस्यांशी यांना काही देणे-घेणे नाही.

निर्लज्ज अधिकारी नगरपालिकेत बसवला…
कार्यक्षम, निष्कलंक असेलेला प्रशासकीय अधिकारी काढून अतिशय निर्लज्ज अधिकारी, भ्रष्टाचारी अधिकारी त्या ठिकाणी आणाला आहे. खासदार बारणे यांच्या मर्जीतील हा अधिकारी असल्यामुळे लोकांची कामे करत नाही. देहू नगरपंचायत, वडगाव नगरपंचाय, वडगाव नगरपरिषद, तळेगाव नगरपरिषद या सर्व ठिकाणचे अधिकारी श्रीरंग बारणे यांच्या शिफारशीनेच आलेले आहेत. अधिकारी हा दोन वर्षांसाठीच असतो. अधिकारी कुणीही आणा. तो कार्यक्षम असावा. त्याने चोख काम करणे अपेक्षित आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणेंच्या कृपाशिर्वादाने आलेले सर्वच अधिकारी हे कुचकामी आहेत. निष्क्रिय आहेत. ज्यांनी हे अधिकारी आणलेत त्यांनी नगरपरिषदेमध्ये महिन्यातून एकदातरी येऊन बसावे. खुला जनता दरबार घ्यावा.

जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न मार्गी लावणार की, हिवाळी अधिवेशनात मांडणार…
60 दिवस जनरल मोटर्स कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. त्यांची बायका, मुले तिथे बसून आंदोलन करत आहेत. या बाबत काही मार्ग निघेल का, या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार महोदय म्हणाले की, जनरल मोटर्स कामगार हे स्थानिक भूमिपुत्र आहेत. त्यांचे प्रश्न सोडवायला मी कुठेही कमी पडत नाही. त्यांची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत, उद्योगमंत्र्यासोबत बैठक लावली. कामगारांना न्याय देण्याचा अधिकार मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनाच आहे. तरीही येत्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात मी आवाज उठवेन. त्यामुळे आता आमदार महोदय जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न मार्गी लावणार की, हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार उपस्थित करणार, अशी चर्चा जनलर मोटर्स कामगारांमध्ये सुरू आहे.

लोकमत जाणून न घेता फडतूस पत्रकाराने टेंट व्यवसायिकांच्या बातम्या केल्या, आम्हाला काही फरक पडणार नाही – सुनील शेळके
आमदार शेळके म्हणाले, कुठल्या तरी एका पत्रकाराने पवनागर येथील टेंट व्यवसायांकडून काही मिळाले नाही म्हणून बातम्या लावल्या असे सांगितले जाते. कुठेतरी टेन्ट व्यावसायिकांकडून त्या पत्रकाराने काही अपेक्षा ठेवल्याचे कळते. परंतु त्याच्यामागच कारण मला माहित नाही. परंतु ज्या पत्रकारांने किंवा ‘ज्या’ वृत्तपत्राने बातम्या लावल्या त्याचा तर मी जाहीर निषेध करतो. शेवटी स्थानिक भूमिपुत्रांची, लोकमत जाणून न घेता त्यांना टार्गेट केले. परंतु, स्थानिक भूमिपुत्रांची बाजू मांडणं त्यांना न्याय देणे, त्यांच्या मागे उभे राहणं हे आमचं काम आहे. आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभे राहणार आहोत. असल्या अडतुस-फडतूस बातम्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत त्यांनी संबंधित पत्रकार व वृत्तपत्राचा खरपूस समाचार घेतला.

..त्यांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा ४५ वर्षांपासून प्रलंबित त्यांचे प्रश्न परखडपणे मांडावेत-शेळके
गेल्या ४५ वर्षापासून आमचं पुनर्वसन करण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांकडून करण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना जो काही मोबदला द्यायचा तो जागेच्या स्वरूपात द्या. त्या जागेवर आम्ही कायदेशीर आणि रीतसर परवानगी घेऊन व्यवसाय करू, अशी मागणी केली आहे. असे असताना शासनाकडून न्याय मिळत नसल्याने ते शेतकरी व्यवसाय करून रोजगार निर्मिती करताहेत. पर्यटनाला चालना देतायेत. त्यातच आता कुठेतरी त्यांचा हंगाम सुरू होतोय आणि कोणीतरी येऊन ब्लॅकमेलिंग करणं, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावणं, यापेक्षा त्यांना न्याय कसा देता येईल, याविषयी बातम्या लावाव्या, असे आवाहन केले.

कोण रवी भेगडे…
भाजपचे माजी मावळ तालुकाध्यक्ष विधानसभेचे निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे म्हणाले की, मावळ तालुक्यात भाजपचाच आमदार आणि भाजपचाच खासदार होणार आहे. यावर उत्तर भाष्य करताना सुनील शेळके म्हणाले की, कोण रविंद्र आप्पा भेगडे… ते ऐनवेळी मला सोडून गेले. आपण साथ साथ हैं, आणि गेली की पळून. त्यांच्या कुठे नादी लागताय. यावर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button