breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बारावीत शिकणा-या मुलीने गळफास घेवून केली आत्महत्या

सांगली – जत तालुक्यातील माडग्याळ येथील बारावीत शिकणार्‍या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी तीन वाजता ही घटना उघडकीस आली आहे. उमदी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. याबाबतची फिर्याद आजोबा तुकाराम वाघमारे यांनी उमदी पोलिस ठाण्यात दिली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.

एकता विजय चंदनशिवे (वय 18) असे त्या मुलीचे नाव आहे. एकताचे कुटुंबीय मूळचे सांगलीचे आहे. ती आजीकडे शिक्षण घेण्यासाठी माडग्याळ येथे राहत होती. ती माडग्याळ येथे बारावी कला विभागात शिकत होती. तिचे बारावी बोर्डचे पेपर शुक्रवारी संपले होते. घरात कोणी नसताना एकताने दुपारी तीन वाजता गळफास घेऊन आपले जीवन संपविले. याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नामदेव दांडगे पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button