breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनधिकृत होर्डिंग्ज लावणा-यांवर फौजदारी गुन्हे; महापालिकेची कारवाई

  • आकाश चिन्ह परवाना विभाग सतर्क
  • कारवाईचे उचलले पाऊल

 

पिंपरी – शहरातील अनधिकृत जाहिराती लावणा-यांविरुध्द उच्च न्यायालयाने आदेश बजावले असताना आजपर्यंतच्या इतिहासात पालिकेने त्याची अंमलबजावनी केली नाही. मात्र, आकाश चिन्ह परवाना विभागाने अनधिकृत फ्लेक्स लावणा-यांविध्द आता कडक भूमिका घेतली आहे. शहरात विविध ठिकाणी बेकायदेशीर होर्डिंग्ज, किऑस्क, फ्लेक्स लावणा-या 17 जणांविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.

शहरात अनधिकृत फलक, किऑस्कबरोबर मोठ-मोठे अनधिकृत होर्डिंग्ज लावले जातात. या अनधिकृत जाहिरातींबाबत उच्च न्यायालयाने वारंवार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून या अनधिकृत जाहिरातींवर दंडात्मक व जाहिराती काढून टाकण्याची कारवाई केली जाते. परंतु, शहरात वाढणा-या अनधिकृत जाहिरातींमुळे विद्रुपीकरण वाढते. त्यासाठी अशा जाहिराती लावणा-यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात होती. तसेच, उच्च न्यायालयाचेही फौजदारी कारवाईचे आदेश आहेत. तरी देखील पालिका प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते.

दरम्यान, आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांनी अधिकृत जाहिराती लावणा-यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या सुचनेनुसार मागील काही दिवसात एकूण १७ अनधिकृत होर्डिंग्ज व किऑस्क लावणा-यांविरुध्द शहरातील संबधित पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अनधिकृत जाहिराती थोपविण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी  अनधिकृत जाहिराती न लावता परवानगी घ्यावी, असे आवाहन विजय खोराटे यांनी केले आहे.

कारवाई सुरूच राहणार
आक. मिडिया, एबीसी बिल्‍डर्स, गोयल गंगा स्कूल, बिग इंडिया, स्मार्ट किडीज, चाटे कोचिंग क्लासेस, रायका अॅकडमी, किडज स्कूल, द्रोणाचार्य अॅकडमी, कॉमर्स अॅकडमी, आयकॉन क्लासेस आदींसह १७ होर्डिंग्ज व किऑस्क लावणा-यांविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. तसेच, आणखी काही जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून यापुढेही फौजदारी कारवाई सुरू राहणार असल्याचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button