breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्रकृतीच्या कारणास्तव अलिबाग पोलिसांपुढे राणे गैरहजर

अलिबाग |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानप्रकरणी अटक झाल्यावर जामीन देताना न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सोमवारी अलिबागच्या स्थानिकगुन्हे अन्वेषण  शाखेच्या कार्यालयात हजेरी लावण्याचा आदेश दिला असला तरी राणे हे पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. यासाठी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देण्यात आले. राणे यांचे वकील अ‍ॅड. संदेश चिकणे यांनी या कार्यालयात जाऊन राणे यांच्यावतीने अर्ज सादर केला.

राणे यांनी संपूर्ण कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेदरम्यान २३ ऑगस्टला  महाड येथील पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली होती. महाड न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. त्यात अलिबाग येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत हजेरी लावावी अशी अट होती. राणे यांच्यावतीने सोमवारी अ‍ॅड. संदेश चिकणे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग कार्यालयात हजर झाले. त्यांनी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची भेट घेतली व राणे यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे  प्रवास करणे शक्य नसल्याने ते  हजर राहू शकत नाहीत, असा अर्ज सादर केला.

प्रकृती बिघडल्याने ते येऊ शकले नाहीत. त्याबाबतचा अर्ज आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली आहेत. न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना दुसरी एक अट घातली आहे कीव्हॉइस रेकॉर्डिग किंवा तत्समबाबत जर नारायण राणे यांनी हजर राहणे आवश्यकअसेल तर सात दिवसांची पूर्वकल्पना देऊन त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे सहकार्य करण्यास ते तयार आहेत.

अ‍ॅड. संदेश चिकणेनारायण राणे यांचे वकील

प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत राणे यांच्या वतीने आजच्या हजेरीतून सूट मिळावी यासाठी वकिलांनी अर्ज दाखल केला आहे. तो आम्ही स्वीकारला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच जिल्हा सरकारी वकिलांशी चर्चा करून याबाबत पुढे काय करता येईल याबाबत निर्णय घेऊ.

–  दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगड

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button