breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बंगळुरूत अलिशान ‘ऑडी’ला अपघात! ७ जण जागीच ठार

बंगळुरू – वाहतूककोंडीत अडकल्यावर संतापलेला क्रिकेटपटू राहुल द्रविड राग अनावर झाल्याने ‘मैं इंदिरानगर का गुंडा हूँ’, असे म्हणत गाड्यांची तोडफोड करत असल्याची जाहिरात लोकप्रिय आहे. त्याच इंदिरानगरमध्ये काल रात्री उशिरा अलिशान ऑडी कारला भीषण अपघात झाला. त्यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात ४ तरुण आणि ३ तरुणींचा समावेश आहे.

बंगळुरूच्या इंदिरानगर परिसरातून काल रात्री उशीरा ७ तरुण-तरुणी अलिशान ऑडी कारमधून सुसाट वेगाने जात होते. त्यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे तिने फुटपाथला धडक दिली. ती एवढी जबरदस्त होती की, त्यामुळे कारच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात कारमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एका जोडप्याचा समावेश आहे. करुणा सागर आणि बिंदू असे या जोडप्याचे नाव आहे. ते २३ वर्षांचे होते. अक्षय गोयल, उत्सव, रोहित, इशिता आणि डॉ. डी. जे. अनुज अशी अपघातात ठार झालेल्या ७ जणांची नावे आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button