breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पीएमपीएमएलचा अखेर संप मागे; पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सेवा पूर्ववत

पुणे : पीएमपीएमएलला गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांना थकीत देयकापोटीची ६६ कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा ठेकेदारांनी संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून पीएमपीएमएलची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सेवा पूर्ववत होण्यास सुरूवात झाली.

पीएमपीएमएलला ठेकेदारांनी ९० कोटींची थकीत रक्कम मिळावी, यासाठी रविवारपासून संप सुरू केला होता. त्याचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील आठ लाख प्रवाशांना फटक बसला होता. संप सुरू झाल्यानंतर पीएमपीच्या वरिष्ठ अधिका-यांनी ठेकेदारांबरोबर चर्चा सुरू केली होती. मात्र थकीत रक्कम मिळत नाहीत, तोपर्यंत गाड्या संचलनात येणार नाहीत, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली होती.

संप कायम राहिल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली होती.

थकीत रकमेपोटी ६६ कोटी रूपये तातडीने देण्यात आले. त्यासाठी पुणे महापालिकने ५४ कोटी तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३६ कोटी पीएमपीला दिले. त्यातून ६६ कोटी ठेकेदारांना आणि उर्वरीत रक्कम एमएनजीएलला थकीत रकमेपोटी देण्यात आली. त्यानंतर संप मागे घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button