breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनाविरूद्घ लढताना सामाजिक बांधिलकीतून कार्यरत राहू :शीतल करदेकर

मुंबई । प्रतिनिधी
कोरोनाविरूद्घ लढाईत महाराष्ट्रात सर्व अत्यावश्यक सेवेतील कोरोना योद्धे काम करत आहेत.त्यात महत्त्वपूर्ण योगदान शहरापासून गावपातळीवरील श्रमिक पत्रकाराचेही आहे. मात्र, दुर्दैवाने राजकीय नेत्यांकडून कृपा झालेले काही मोजके पत्रकार सोडले, अन्य पत्रकारांवर अन्याय होत आहे, अशी टीका नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शितल करदेकर यांनी केली आहे.
करदेकर म्हणाल्या की, सरकारी कृपेस इतक्या मोठ्या महाराष्ट्रात फक्त 3000च मान्यताप्राप्त पात्र होतात! हे खेदजनक आहे. मागील वर्षी अचानकपणे लॉकडाऊनचं संकट आल्यावर मुंबई शहरापासून ते राज्यभरातील हजारो पत्रकारांना ज्या त्रासातून जावे लागले,त्याचेसाठी काही करावं असं सरकारला वाटल असलं तरी कोणतीही मदत गरजू माध्यमकर्मिना केली गेली नाही.
एनयुजे इंडियाचे ज्येष्ठ नेते व एनयुजेमहाराष्ट्र चे मार्गदर्शक शिवेंद्रकुमारजी यांच्या सूचनेनुसार मुंबई, उपनगर,ठाणे,पालघर,पुणे ग्रामीण ,सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील गावपातळीवर पत्रकारासह गरजू लोकांना सहाय्यता केली.मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी नाट्यगृहाच्या डोअर किपर्सना देण्यास अन्नधान्य सामग्रीची मदत दिली आणि एनयुजेमहाराष्ट्र च्या राज्यभरातील जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून मदत करण्याचे काम गतीमान झाले. आता पुन्हा तेच काम करण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या राज्यकार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. लाॅकडाऊन कालावधीत सरकारी सहाय्यतेच्या व आवाहनाची माहिती आपल्या माध्यमातून पोहोचवणे,
गैरसमज पसरवणारे फॉरवर्डेड मेसेजबाबत सजग राहून ते थांबवणेस सहकार्य करणे,जीवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकणाऱ्याचा पर्दाफाश करणे,औषधोपचार, आरोग्य सेवा ,औषधविक्रीचा काळाबाजार लुटमार करणाऱ्यांचे चेहरे समोर आणणे, गरजू माध्यमकर्मीसह आपआपल्या जिल्ह्य़ातील गरजूंना मदत मिळणे सहकार्य करणे,निवडून आलेले लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, खासदार आपल्याच विभागात मतदान केलेल्या जनतेला मदत न करता नुसतीच शायनिंग करत असतील तर अशा महान लोकसेवकाची वास्तव माहिती समोर आणणे. महाराष्ट्राची ही लढाई फक्त कोरोनाविरूद्घ नाही तर सामाजिक गुन्हेगार व महाराष्ट्र द्रोह्याविरोधात आहे. याकामी सहकार्य करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असेही शीतल करदेकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button