Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडकिल्ल्यांच्या संवर्धनचा मुद्दाहा पुन्हा ऐरणीवर

कोल्हापूरः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने धन्य झालेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा गडकिल्ल्यांच्या संवर्धनचा मुद्दाहा पुन्हा ऐरणीवर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा दाखला देणारा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गड हा सध्या धोकादायक बनला आहे. पन्हाळा गडावरील चार दरवाजा जवळील नेबापुरकडे जाण्याच्या मार्गावर असणारी ऐतिहासिक भिंत कोसळली आहे. पन्हाळ्यावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चार दरवाजाच्या जवळ असलेल्या नेबापुर गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवरील शिलहार भोज राजाच्या काळात बांधली गेलेली ही ऐतिहासिक भिंत कोसळल्याने पायथ्याशी असणाऱ्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. तसेच येथील भिंतीजवळील झालेल्या भूस्खलनाची दखल पुरातत्व विभाग कधी घेणार हा प्रश्न निर्माण होत आहे.

गेल्या वर्षी पन्हाळगडावर झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनामुळं रस्ता खचला होता आणि पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट आले होते. यानंतर काही काळ येथील रस्ता बंद देखील करण्यात आला होता. मात्र, आज ही येथे अशीच परिस्थिती इथे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वास्तू असलेल्या या पन्हाळगडावर सतत पडणाऱ्या पावसाने पन्हाळ्याच्या तटबंदीचा व जीर्ण भिंतींचा दरवर्षी थोडा भाग कोसळत चालला आहे. पुरातत्व विभागाने पाहणी केली पण पुढे निधी अभावी काम रखडले असल्याने गावकरी आणि शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांवर मात्र भीतीच सावट निर्माण झालं आहे.

कोल्हापूर शहराला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा समना करावा लागत असतानाच तालुक्यात ही काही वेगळी परिस्थिती नाहीये. पन्हाळा पायथ्याशी असलेले ग्रामस्थ ही इथे दिवस रात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. शहरात मदतीसाठी यंत्रणा सक्षम आहे. मात्र, तालुक्यात कोण लक्ष देणार ? गेल्या वर्षी रस्त्याचे भुस्खलन झाले आणि रस्ता खचला आणि पन्हाळगडच्या भिंतीना ही धोका पोहचला काही ठिकाणी भेगा पडल्या तर काही ठिकाणी भिंतच कोसळली. यामुळे पुरातत्त्व विभागाचे या किल्ल्याच्या संवर्धनाकडे लक्ष नाही का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसेच, पावसाळ्यात धोका लक्षात घेऊन नागरिकांचे स्थलांतर करणे गरजेच असताना प्रशासन याकडे कानाडोळा का करत आहे? दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? यासारखे अनेक प्रश्न आता येथे उपस्थित होत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button