TOP Newsताज्या घडामोडीपुणे

रमजान ईद आता मंगळवारी होणार साजरी, शेवटचा उपवास सोमवारी

पुणे : मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याचा चंद्र रविवारी दिसला नसल्याने आता रमजान ईद (Ramadan Eid) मंगळवारी (३ मे) साजरी होणार आहे. हिलाल सिरत कमिटीच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास (रोजा) करण्यात येणार आहे. (Ramadan Eid will now be celebrated on Tuesday)

गेली महिनाभर मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे कडक उपवास करीत होते. पहाटे सहेरी करून सूर्यास्तानंतर इफ्तारी करून दिवसभराच्या निर्जल उपवास सोडला जात होता. त्याशिवाय विशेष नमाज पठण केली जात होता. कुराणाचे देखील पठण करीत अल्लाहचे नामसमरण करून सुख, शांती बरोबर आयुष्यात येणारी संकटे दूर करण्याची दुआ मागण्यात आली. रविवारी चंद्रदर्शन होईल अशी मुस्लिम बांधवांना अपेक्षा होती मात्र पुण्यासह देशात कोठेही चंद्र दर्शन झाले नाही.

याबाबत हिलाल सिरत कमिटीचे सरचिटणीस रफिउद्दीन शेख म्हणाले, ‘पुण्यात रविवारी चंद्रदर्शन कोठेही झाले नाही. त्यामुळे सोमवारी दोन मे रोजी शेवटचा तिसावा उपवास होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी, तीन मे रोजी रमजान ईद साजरी होईल.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button