breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपुणेराष्ट्रिय

दिल्लीतील ‘राजपथचं’ आता ‘कर्तव्यपथ’ असं नामकरण होणार; एनडीएमसीच्या बैठकीत नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर

 । नवी दिल्ली । महान्यूज । वृत्तसंस्था । 

केंद्र सरकारद्वारे ‘राजपथ’चे नाव बदलण्याचा निर्णय झालेला आहे. आतापर्यंत ‘राजपथ’ म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण परिसर आता ‘कर्तव्यपथ’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘राजपथ’सोबतच सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. यासंबंधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बुधवारी, 7 सप्टेंबर रोजी एनडीएमसीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नेताजी पुतळा ते राष्ट्रपती भवन हा संपूर्ण मार्ग आता ‘कर्तव्यपथ’ होणार आहे. शिक्षक दिनानिमित्त सोमवारी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 सप्टेंबर रोजी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील या पुढील टप्प्याचे उद्घाटन करतील.

दिल्लीत येणाऱया लोकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र असणारा ‘सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यू’ पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये संसदेची नवीन त्रिकोणी इमारत, एक सामान्य केंद्रीय सचिवालय, तीन किलोमीटरच्या राजपथाचे पुनरुज्जीवन, नवीन पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालये आणि उपराष्ट्रपती भवन यांचा समावेश आहे.

खाद्यपदार्थ स्टॉल्सचे आकर्षण
सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत राजपथाच्या बाजूने प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असून चहूबाजूंनी हिरवेगार असलेले लाल ग्रॅनाईट वॉकवे साकारण्यात आले आहेत. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पस्थळी पाच वेंडिंग झोन तयार करण्यात आले असून तेथे 40 स्टॉल्सना परवानगी दिली जाणार आहे. इंडिया गेटजवळ दोन ब्लॉक असून प्रत्येक ब्लॉकमध्ये आठ दुकाने असतील. मात्र, उद्यान परिसरात कोणतेही खाद्यपदार्थ विक्रीस आणि खाण्यास मनाई करण्यात येणार आहे.

कडक सुरक्षेवर भर
प्रकल्प सर्वसामान्य लोकांसाठी खुला झाल्यानंतर तेथे चोवीस तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या सुविधांमध्ये चोरी आणि नुकसान होऊ नये यासाठी पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुमारे 80 सुरक्षारक्षक या मार्गावर लक्ष ठेवणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. तसेच दहशतवादी हल्ल्यापासून सावधानता बाळगण्यासाठी अन्य यंत्रणांची मदतही घेतली जाणार आहे. सर्व परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारेही नजर ठेवली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button