breaking-newsEnglishUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

अबब ! गुजरातजवळ पाकिस्तानी नौकेतून 200 कोटींचे हेरॉइन जप्त, सहा जण ताब्यात

नवी दिल्ली । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गुजरातनजीकच्या भारतीय सागरी हद्दीत तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) संयुक्तपणे आज सकाळी मोठी कारवाई केली. भारतीय तटरक्षक दल आणि एटीएसने एक नौका पकडली. त्यात सुमारे 40 किलो हेरॉइन होते. त्याची किंमत साधारणपणे 200 कोटी आहे. याप्रकरणी बोटीवरील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त पथकाने कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरापासून नजीक 33 सागरी मैलावर एक मच्छीमार नौका अडवली. ही नौका पाकिस्तानी होती आणि त्यात ड्रग्ज असल्याचे आढळले. गुजरातच्या किनाऱ्यावर उतरवल्यानंतर हे अंमलीपदार्थ रस्तामार्गे पंजाबमध्ये नेण्यात येणार होते, अशी माहिती एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिली.

एक संशयास्पद नौका गुजरातच्या किनाऱ्यावर येणार असल्याची खबर एटीएसला मिळाली होती. त्यानुसार तटरक्षक दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. नौकेवरील सहा पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे 40 किलो हेरॉइन सापडल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. गुजरात एटीएसने गेल्या नऊ महिन्यांत केवळ गुजरातच नव्हे तर, विविध राज्यांमध्ये छापे टाकून सुमारे 6500 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.

गुजरात एटीएसची चार दिवसांत दुसरी मोठी कारवाई
गुजरात एटीएस आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) चार दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये कारवाई करून तब्बल 200 कोटींचे हेरॉइन जप्त केले होते. स्क्रॅपच्या कंटेनरमध्ये ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानुसार कोलकाता बंदराजवळ छापा टाकण्यात आला.

दुबईवरून आलेल्या स्क्रॅपच्या कंटेनरमध्ये 7220 किलो भंगार होते. त्यात 36 गिरबॉक्स होते. त्यापैकी 12 गिअर बॉक्समध्ये 40 किलो हेरॉइन लपवण्यात आले होते. या बॉक्सवर पांढऱ्या शाईने विशिष्ट खूण करण्यात आली होती. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले. हे ड्रग्ज फेब्रुवारी महिन्यात कोलकाता बंदरावर पोहचले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button