breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सम-विषम’ पध्दतीने दुकाने सुरू करण्याचा प्रयत्नाला गालबोट, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

टाळेबंदीचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याच्या प्रक्रियेतील भाग म्हणून शहरात ‘सम-विषम’ पध्दतीने दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न पहिल्याच दिवशी फसला. याच चुकांची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होताना दिसतेय. शहर परिसरातील मध्यवर्ती परिसरातील बाजारपेठेसह सर्वच रस्त्यांवरील दोन्ही बाजुंची दुकाने नेहमीप्रमाणे सुरु राहिल्याने परिसरात नागरिकांसह वाहनचालकांची वर्दळ वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. शारीरिक नियमांचे अंतर, मुखपट्टी या सर्व नियमांचा बोजवारा उडाला. दुसरीकडे, निर्बंध शिथील झाल्याने आर्थिक घडामोडींना वेग आला असला तरी शहर परिसरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे.

टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यात अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य शासनाने ‘पुन्हा सुरूवात’ म्हणत विविध निर्बंध शिथील केले. सोमवारपासून अटीशर्तीसह खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी दिली. यासाठी आस्थापना, व्यापारी, महापालिका पदाधिकारी यांच्या बैठका झाल्या. गर्दी होऊ नये या अनुषंगाने नियोजन करतांना सम-विषम तत्वावर दुकाने सुरू करण्याची मुभा दिली गेली. यात सम तारखांना एका बाजूकडील आणि त्यासमोरील दुकाने विषम तारखेला उघडण्याच्या निर्णयाच्या अमलबजावणीविषयी अस्पष्टता असल्याने या निर्णयाला दुकानदारांनी केराची टोपली दाखवली.

मुळात खरेदीसाठी वाहन वापरण्याची परवानगी नसतांनाही दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक वाहने रस्त्यावर बिनधिक्कत आल्याने मुख्य रस्त्यासह पर्यायी मार्गांवर सुद्धा मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळते.

अनेक भागात सम-विषमचे क्षेत्र निश्चित न झाल्याने गोंधळ उडाला. सार्वजनिक वाहन व्यवस्था सुरू नसतांनाही अनेकांनी आपल्या दुचाकीवर तर कोणी पायपीट करत आवश्यक सामान खरेदी करण्यासाठी गर्दी केली. हीच स्थिती बँक, टपाल कार्यालयात होती. निर्बंध शिथील केल्याचा अर्थ टाळेबंदीची मुदत संपली असा घेत अनेकांनी आपले राहिलेले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी गर्दी केली. जिल्हा न्यायालयांचे कामकाजही सोमवारपासून नियमीत सुरू झाल्याने या परिसरात नेहमीच्या तुलनेत वर्दळ राहिली.

अशा प्ररकारे स्त्यावर घोळका,सोशल डिस्टन्सिंगला फाटा देत किरकोळ विक्रेत्यांनी या गर्दीत प्रशासकीय नियमावलीला तिलांजली देत काम सुरू ठेवले. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या परिणामांना सामोर दाव लागू शकत हे येणारा काळच ठरवेलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button