breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सदा सरवणकरांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी पोलिसाला लागली असती, अखेर गुन्हा दाखल

सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला; शिंदे गटाकडूनआरोप

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिंदे गटही सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली आहे. सत्ता गेल्यामुळे शिवसेना बिथरली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला.

समाधान सरवणकर यांचे बॅनर्स फाडायला सुरुवात
मुंबई: शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवला आहे. आमच्या अनिल परब यांनी कायद्याचा कीस काढून पोलिसांना ही बाब पटवून दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गु्न्हा दाखल केला, असे वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केले. ते रविवारी दादर पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Mumbai Police file complaint against Sada

प्रभादेवी आणि दादर परिसरात शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते, तर महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक केली होती. यानंतर शिवसेनेचे मुंबईतील बडे नेते सक्रिय झाले होते. हे सर्वजण रविवारी सकाळपासून दादर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. सदा सरवणकर यांनी आपल्या पिस्तुलातून राडा झाला त्याठिकाणी आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा दोन ठिकाणी फायरिंग केले. आमचे शिवसैनिक याची तक्रार दाखल करायला गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले, असा आरोप अरविंद सावंत यांनी केले.

शिवसैनिक आक्रमक,समाधान सरवणकरांचे बॅनर्स फाडले
दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसैनिक आणखीनच आक्रमक झाले. त्यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शिवसैनिकांच्या एका गटाने दादर परिसरातील समाधान सरवणकर यांचे बॅनर्स फाडायला सुरुवात केली आहे. याशिवाय, समाधान सरवणकर यांच्या बॅनर्सवर काही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे दादरमधलं वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button