Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मतदारांना कुठलाही त्रास होऊ नये; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची सूचना

पुणे : मतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शक, ठिकाणदर्शक फलक असावेत. मतदारांना आपले मतदान केंद्र माहित असावे, यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी भरावयाचे सर्व नमुने, अहवाल व्यवस्थितरित्या भरुन वेळेत पोहोचतील आदी बाबींबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे.

पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरून येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा    –      महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना माजी सैनिकांचा पाठिंबा

पुणे येथे नुकतीच विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार म्हणाले की, सायंकाळी लवकर अंधार पडत असल्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांनी आपल्या क्षेत्रातील विद्युतपुरवठा नसलेल्या मतदान केंद्रावर विद्युतपुरवठ्याची व्यवस्था करावी.

पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. मतदानावेळी गर्दी होऊ नये यासाठी मतदारांच्या रांगाचे व्यवस्थापन करावे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांना सर्व टप्प्यांवर आवश्यक ती माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

“पुणे जिल्ह्यातील तयारीबाबत सादरीकरण करताना म्हणाले की, जिल्ह्यात मतदार चिठ्ठ्याचे शंभर टक्के वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर समसमान मतदारसंख्या असेल अशी रचना करण्यात आली आहे. मतदानावेळी रांगाच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तेथे राखीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.”

– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button