Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत बदल

पुणे | किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथील शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत (०.०० वा.) जुन्नर शहर व परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार नारायणगाव येथून जुन्नरकडे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा-खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल मार्गाने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड वाहनतळ या ठिकाणी जातील. ताथेड वाहनतळ ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज-सावरगाव-वारुळवाडी-नारायणगाव- घोडेगाव मार्गे जाईल.

हेही वाचा  :  महाबळेश्वर येथे २६ ते २८ एप्रिल दरम्यान पर्यटन महोत्सव; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती 

गणेशखिंड- बनकफाटा- ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे माध्यमिक शाळा व आसपासच्या परिसरात असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण- अहिल्यानगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे – सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड वाहनतळ येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button