breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘EVM हॅक करता येतं, मला माहिती आहे’; महादेव जानकर यांच मोठं विधान!

Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलून महायुतीला टार्गेट केलं आहे. देशातील लोकशाही धोक्यात असून ईव्हीएमममुळे महायुतीच्या जागा वाढल्या, असं ते म्हणाले आहेत.

महादेव जानकर हे कधी महायुतीसोबत तर कधी महायुतीच्या बाहेर असतात. बाहेर असले की भाजपवर जोरदार टीका करतात आणि आतमध्ये असले की मोदींना मोठा भाऊ म्हणतात. लोकसभेला अजित पवार यांच्या कोट्यातून जानकरांनी परभणीतून उमेदवारी मिळवली होती.

विधानसभेला महायुतीमधून बाहेर पडलेल्या जानकर यांनी महायुतीच्या अभूतपूर्व विजयावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने ईव्हीएमविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. तर जानकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन देत ईव्हीएम हॅक करता येतं, असं विधान केलंय.

हेही वाचा –  महाविकास आघाडीत बिघाडी, आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा

मी इंजिनियर आहे, त्यामुळे मला माहिती आहे.. ईव्हीएम हॅक करता येतं. अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. त्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमममुळे देशातली लोकशाही धोक्यात असल्याची आमची भूमिका आहे. बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी जानकरांनी केली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि मागे महायुतीतील घटक असलेल्या महादेव जानकर यांनी आपणाला महायुतीचा खूप वाईट अनुभव आला असल्याचं म्हटलं आहे. शिवाय यामुळेच महायुतीतून बाहेर आलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी आपणाला अद्याप काँग्रेसचा अनुभव नाही. त्यामुळे आता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका घेतल्याचंही जानकरांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये २८८ जागांपैकी २३० जागांवर महायुतीने विजय प्राप्त केला आहे. यात भाजने १३२ जागा जिंकल्या, शिवसेनेने ५७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४१ जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडने एकूण ४६ जागा जिंकल्या आहेत. यात काँग्रेसने केवळ १६ जागा जिंकल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button