Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सहा दिवस रात्री बारापर्यंत स्पिकर ; विसर्जन मिरवणूकीसाठी समन्वय बैठक

पुणे :  गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीपर्यंत रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धक वाजविण्यास परवानगी आहे. गौरी विसर्जन आणि पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाल्याने नागरिक सहकुटूंब देखावे पहाण्यास बाहेर पडत आहेत.

यामुळे त्यांना रात्री बारापर्यंत देखाव्यांचा आनंद घेता येणार आहे. त्यानंतर ध्वनिवर्धक बंद असणार आहेत, देखावे मात्र सुरू राहतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.गणेश विसर्जन मिरवणुकीत विविध विभागांचा समन्वय रहावा तसेच उत्सव विना विघ्न पार पडावा म्हणून अमितेश कुमार यांनी गुरुवारी बैठक घेतली.

हेही वाचा    –      डेंग्यू, मलेरियानंतर आता टायफॉईडची साथ, ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

यामध्ये सदर निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महावितरणचे अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, पीएमआरडीएचे अधिकारी आणि मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांनी सांगितले की, उत्सवा संदर्भात पूर्व तयारीच्या बैठका प्रत्येक विभागांनी घेतल्या आहेत. मात्र, एकत्रित समन्वय बैठक झाली नव्हती.

पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था असली तरी बॅरिेकेटचे, रस्त्यांचे काम आणि अतिक्रमणची जबाबदारी महापालिकेची असती, विसर्जन मिरवणूकी दरम्यान बॅरिकेट कोठे लावावेत,कोठून रस्ता खुला ठेवावा तसेच पथारिवाल्यांना कोठे बंदी घालावी ही बाबही कायदा सुव्यवस्थेच्या दुष्टीने महत्वाची असते. यामुळे सर्व विभागांना एकमेकांशी समन्वय ठेवा यावा या उद्देशाने ही बैठक झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button