रक्षाबंधनाची अनोखी भेट मिळाल्याने महिला गहिवरल्या!

- रक्षाबंधनानिमित्त भाजापा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांचा भगिनींच्या आरोग्य रक्षणाचा संकल्प
पिंपरी | प्रतिनिधी
भोसरी, इंद्रायणीनगर येथील भगिनींना यंदा रक्षाबंधन सणाची अनोखी भेट मिळाली. राखीपौर्णिमेचे औचित्य साधत भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी चक्क या महिलांना राखी देत त्यांच्या आरोग्य रक्षणाचा संकल्प सोडला. यामुळे या महिलांना अक्षरशः गहिवरून आले.भाऊ बहिणीचे नाते विणणारी दोर म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या अनेक कथा, अख्यायिका आपल्याकडे सांगितल्या जातात. असाच एक वेगळा अनुभव इंद्रायणीनगर येथील महिलांनी घेतला.
शिवराज लांडगे यांनी रक्षाबंधन निमित्त इंद्रायणीनगर येथील महिलांना राख्यांचे वाटप केले. या राखी सोबत असणाऱ्या कार्डवर एक संदेशदेखील त्यांनी दिला आहे त्यात म्हंटले आहे. “प्रिय ताई, तुला ही राखी जेव्हा हातात भेटेल, तेव्हा ती केवळ राखी नाही, तर तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या आरोग्य रक्षणाचा मी घेतलेला संकल्प आहे. तुमच्या आरोग्यसेवेचे ते बंधन आहे” हा संदेश वाचून महिला अक्षरशः गहिवरल्य. त्यांना आपले आनंदाश्रू यावेळी लपवता आले नाही.
गेली दीड वर्ष आपण कोरोनासारख्या महामारीसमवेत जगत आहोत. या महामारीने ‘आरोग्य सुरक्षा’ म्हणजे काय? याचे महत्त्व आपल्याला पटवून दिले. म्हणून मी ज्या भागात राहतो तेथील भगिंनीच्या
आरोग्य सुरक्षेचे वचन मी त्यांना दिले आहे. बहीण भावाच्या या नात्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी राखीची रेशीम भेट मी त्यांना दिली आहे.
– शिवराज लांडगे, उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पिंपरी- चिंचवड.