
पुणे : सापांचे सरपटण्याचा वेग नेमका किती असतो ? त्याचे वय किती आहे. ज्याबद्दल सर्वसामान्यांना जास्त माहिती नाही. एकाच एक प्रश्न आहे की सांप किती तास झोपतात. सर्वात सुस्त समजला जाणारा अजगर किती तास झोपतो ? सापांच्या झोपेचा विचार केला तर ते २४ तासांपैकी १६ तास झोपतात.
अजगर याचा झोपण्याचा कालावधी प्रदीर्घ असतो. आशिया, आफ्रीका आणि ऑस्ट्रेलियात आढळणारा विशालकाय अजगर १८ तासांची मस्त झोप काढत असतो. जे साप रात्रीचे सक्रीय असतात ते दिवसा झोपा काढतात. तर दिवसा सक्रीय असणारे साप रात्री झोपतात
हिवाळ्यात मात्र साप कुंभकर्णी झोप काढतात. साप थंडीत हायबरनेशनमध्ये जातात. ते या दरम्यान अनेक आठवडे ते महिने झोपतात. रामायणातील रावणाचा भाऊ कुंभकर्ण सहा महिने झोपायचा तसेच सापांची शीतकालिन समाधी असते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
थंडीत बहुतांश साप बिळात किंवा गुहेत झोपतात. या वेळी ते जादा काळ झोपतात. थंडीत साप २० ते २२ तास झोपा काढतात. विशाल अजगर थंडीत एका वेळी शिकार केल्यानंतर अनेक दिवस झोपून असतो.
आपली झोप अनेक टप्प्याची असते. जशी हल्की झोप, गाढ झोप आणि अधुरी झोप. अशावेळी झोपेत आपण स्वप्नं पहातो. परंतू सापांची झोप वेगळी असते. शीतकालीन निद्रावस्थेत सापांचे शरीर लगबग निष्क्रीय होते. त्यांच्या हृदयाची गती धीमी होते. ते श्वासही एकदम हळूहळू घेतात. त्यावेळी ते झोपलेत की मेलेत हे देखील समजत नाही.
थंडीत सापांचे शरीर गार पडते. त्यावेळी त्यांना अन्न शोधण्यासाठी शिकार करणे आणि भक्ष्य शोधणे अवघड बनते. यामुळे ते शीतनिद्रावस्थेत पोहचतात. त्यावेळी शरीरात आधीच साठलेल्या चरबीचा ते अन्नसाठी वापर करतात. ही चरबी त्यांना जगवते. काही साप तर आठ महिने शीतकालिन निद्रेत असतात.त्याच्या शीतनिद्रेचा काळ हा त्याची प्रजाती आणि वातावरणावर अवलंबून असतो. शीतकालीन निद्रेत त्यांचे वजन देखील घटते.