दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक!
असंवेदनशील प्रकाराविरोधा घोषणाबाजी : रुग्णालयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी

पुणे : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागला. या घटनेनंतर शिवसेना महिला आघाडीने आक्रमक पावित्र घेतला. शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे यांनी थेट रुग्णालयासमोर जाऊन प्रशासनाचा धिक्कार केला.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या भगिनीचा प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. दीनानाथ रुग्णालय प्रशासनालय आगाऊ रक्कम भरण्याच्या नावाखाली भिसे परिवाराची अडवणूक केली. वेळेत प्रसूती न झाल्याने भिसे परिवारावर अनर्थ ओढवला. रुग्णालयाच्या आडमुठेपणामुळे हा प्रसंग घडल्याचे वाऱ्यासारखे पसरले. या विरोधात अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – ओडिसा राज्यातील महोत्सवात केडगांव येथील आर्ट अॅण्ड मोशन संघाची चमकदार कामगिरी!
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाच्या वागणुकी विरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी रुग्णालयासमोर जाऊन प्रशासनाचा धिक्कार केला. महिला आघाडीच्या वतीने गीतांजली ढोणे, कल्पना थोरवे शैला पाचपुते, सरिता साने, नीता कटके, सुरेखा तोडे, स्वाती वाशीवाले, पूजा रावतेकर यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या कोणत्याही निकषाचे पालन हॉस्पिटल कडून केले जात नाही. शासनाकडून सवलती मिळवणे आणि नागरिकांकडून वारेमाप पैसा उकळणे हे यांचे एककलमी धोरण झाले असल्याचे उबाळे म्हणाले. भिसे कुटुंबीयांवर झालेल्या प्रसंगाची हानी भरून काढू शकत नाही. मात्र यापुढे असे होऊ नये यासाठी प्रशासनावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
– सुलभा उबाळे, उपनेत्या, शिवसेना.