ओडिसा राज्यातील महोत्सवात केडगांव येथील आर्ट अॅण्ड मोशन संघाची चमकदार कामगिरी!

नेवासा : ओडिसा राज्यातील जगतसिंगपूर येथे आयोजित केलेल्या जिल्हा महोत्सवामध्ये पाच राज्यातील नृत्य स्पर्धकांनी नृत्यकला सादर केली. या स्पर्धेत केडगांव येथील आर्ट अॅण्ड मोशन डॉन्स स्टुडिओने महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीचे शिरपेचात मानाचा तुरा रोवून शानदार कलाकृती सादर केली. त्यामुळे पुणे येथील आर्ट अॅण्ड मोशन टिमच्या संस्कृतीक विभागाचे प्रमुख मुंबईचे सागर रोकडे आणि रॉबिन मंगलम टिमचे राज्यभरातून कौतुक केले जात आहे.
जगतसिंगपूर येथे बुधवार (दि.२) रोजी जिल्हा महोत्सवात पाच राज्यातून नृत्यकलाकार सहभागी झालेले होते. महाराष्ट्र राज्यातून आर्ट अँण्ड मोशन डान्स स्टुडिओ केडगाव पुणे यांनी ओडिसा राज्यामध्येही महाराष्ट्र राज्याची देखणी संस्कृती प्रदर्शित केली. यामध्ये संस्कृत विभाग प्रमुख मुंबईचे सागर रोकडे आणि रॉबिन मंगलम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
हेही वाचा – पुणे विमानतळावरून प्रवाशांची कोटींची ‘उड्डाणे’, एक कोटी प्रवाशांचा टप्पा पार
यामध्ये समाजसेवक धनराज मासाळ सर, उपासना मासाळ, श्रावणी वाघ, साक्षी शेंडगे, रुणाली मुथा, विभावरी तांबे, राशी कटारिया, कार्तिकी नेवासे, अंकिता कुलथे, तेजस्विनी साळुंके यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन उत्कृष्टपणे सादरीकरण केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
महाराष्ट्र राज्याच्या संघाने थेट ओडिसा राज्यात झालेल्या जिल्हा महोत्सवात नृत्यकलाकारांनी सहभागी होत संस्कृतीची शान आणि मान वाढविलेला आहे. त्यामुळे या नृत्यकलाकारांचे विभागीय आयुक्तांनी ट्रॉफी देऊन महाराष्ट्र संघाचा सन्मान केल. या संघाने ओडिसा राज्यात आपल्या कलेचा शानदार अविष्कार सादर केल्यामुळे राज्यातील विविध सांस्कृतिक विभागाकडून या संघाचे मोठे कौतुक केले जात आहे.