Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महापालिकेत ठिय्या आंदोलन

पुणे : शहरात डेंगी, चिकनगुनियाच्या  साथीने थैमान घातले आहे, घराघरांत सर्दी, तापाने फणफणलेले रुग्ण आहेत. तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग खोटी आकडेवारी देत आहे. औषध फवारणी करत नाही असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जोरदार आंदोलन केले. यावेळी हातामध्ये फलक घेऊन घोषणाबाजी केली.

शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, विशाल धनवडे, वसंत मोरे, अविनाश साळवे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट आदी यामध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा    –      टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्त्व, पाहा संपूर्ण संघ 

महापालिका आयुक्त भेटण्यास विलंब झाल्याने या पदाधिकाऱ्यांनी दालनात ठिय्या मांडून आयुक्त साहेब बाहेर या, महापालिका प्रशासनाचा निषेध, प्रशासन बसले सत्तेवर पुणेकर मात्र वाऱ्यावर अशा घोषणा सुरु केल्या. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. आयुक्तांकडून प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती देत असताना ही माहिती खोटी आहे, प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button