Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पोलीस महासंचालकांकडून विजयस्तंभ अभिवादन सोहळा बंदोबस्ताचा आढावा; पोलीस आयुक्तालयात बैठक

पुणेः १ जानेवारी या दिवशी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंथ अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून प्रशानाच्या वतीने या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळाची पाहणी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून करण्यात आली. शुक्ला यांनी कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची पाहणी केली. येथील संपूर्ण व्यवस्थेचा त्यांनी आढवा घेतला. तसेच वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधीस्थळी भेट दिली. समाज बांधवांना देण्यात येणाऱ्या सुविधा यामध्ये पार्किंग आणि पोलीस बंदोबस्तची माहिती त्यांनी घेतली.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस हवालदार संदीप कारंडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस हवालदार अनिल जगताप कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, भूषण गायकवाड, युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, पांडुरंग गायकवाड यांसह आदी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न…’; प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादावर अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका

१ जानेवारी २०१८ मध्ये येथे मोठ्या प्रमाणावर दंगल उसळून आली होती. या पार्श्वभूमीवर दरवर्षी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून येथील परिसरात असणाऱ्या चौकाचौकात वस्तीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून शिक्रापूर येथील गावात पोलिसांचे पथसंचलन केले जात आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा या भागात तैनात करण्यात आला आहे. तसेच कोरेगाव भीमातील पुणे-नगर महामार्गावरून पोलिसांनी सशस्त्र संचलन करून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button