Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आढावा बैठक संपन्न; सेवासुविधांचा सखोल अभ्यास

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीत आज (शनिवारी) मोठ्या प्रमाणावर आढावा बैठक आणि पाहणी दौरा पार पडला. या दौऱ्याला आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विविध प्रशासनिक व सामाजिक संस्थांचे अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले.

या बैठकीत देहू शहर प्रवेशद्वार, स्वागत योजना, इनामदार वाडा आणि संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. तसेच पालखी मार्गातील मुख्य मंदिर व घाट परिसराची पाहणी करून, या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा यांची दक्षता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

हेही वाचा –  लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

भक्त निवासस्थळे व सभागृह परिसरात आयोजित नियोजन आढावा बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक नियमन, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि स्वयंसेवकांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व संबंधित यंत्रणांना सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी दिशा देण्यात आली आणि भक्तांना अडचण न येता कार्यक्रम सुरळीत पार पडावा यावर भर देण्यात आला.

या दौऱ्यात नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपनगराध्यक्षा प्रियांका मोरे, देवस्थान विश्वस्त उमेश महाराज मोरे, हवेली तहसीलदार जयराम देशमुख, पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, मुख्याधिकारी चेतन कोंडे, एम.एस.ई.बी उपअभियंता सरोदे तसेच पीएमआरडीए, पी.एम.पी.एल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते.

“जिथे असे मुखी विठ्ठलनामाचा गजर, तिथे रात्रंदिनी होईल भक्तीचा जागर!” या मंत्रानुसार संपूर्ण यजमान समाजाने संत तुकाराम पालखी सोहळा भक्तिभावपूर्ण, सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार पडावा, यासाठी एकात्मिक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button