ताज्या घडामोडीपुणे

राजेंद्रने वडिलांच्या निधनाचे खोटे मृत्यूपत्र बनवून मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न

वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे सध्या चांगलेच चर्चेत

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीला तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तक्रारीमध्ये आहे. त्यानंतर वैष्णवीच सासरे राजेंद्र हगवणे यांच्याविषयी मोठी माहिती समोर येत आहे. त्यांनी स्वत:च्या वडिलांनाही सोडले नसल्याचे म्हटले जात आहे.

राजेंद्र हगवणेच्या वडिलांविषयी

राजेंद्र हगवणेच्या वडिलांचे नाव तुकाराम हगवणे होते. ते मुळशीतील भुकुम गावातील प्रसिद्ध पैलवान होते. आधी ते काँग्रेसमध्ये होते. नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा ते राष्ट्रवादीत आले. तुकाराम हगवणे पंचायत समितीचे सभापती होते. तसेच ते पुणे जिल्हा परिषदेतही होते. तसे पाहायला गेले तर राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे या भागातील राजकीय प्रस्थ होतं. पण राजेंद्र हगवणे राजकीयदृष्ट्या कधीही यश मिळाले नाही. राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2004 साली राजेंद्र मुळशी विधानसभा लढला. त्याला यश मिळाले नाही. तो सपाटून पडला.

हेही वाचा –  भाजप महिला मोर्चाचा चौंडीला विशेष भेट दौरा

नेमकं काय केलं?

हगवणेचा शेती आणि दुधाचा व्यवसाय होता. राजेंद्रने कालांतराने जमिनीचे व्यवहार, कंत्राट देखील घ्यायला सुरुवात देखील केली होती. एकदा तर राजेंद्रने वडिलांच्या निधनाचे खोटे मृत्यूपत्र बनवून संपूर्ण मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा घाणेरडा डाव सर्वांसमोर आला आणि फसला.

सध्या संपूर्ण हगवणे कुटुंब तुरुंगात आहे. त्यांची सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कुटुंबावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्याची हकलपट्टी करण्यात आली आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून हुंड्यात मिळालेल्या सर्वच गोष्टी जप्त केल्या आहेत. आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button