शेवगा अशी भाजी ज्यात साधेपणात मोठी ताकद
जगातील सर्वात ताकदवान भाजी, गुडघेदुखीवर रामबाण उपाय…

मुंबई : जर तुम्ही बाजारात एक शेवग्याच्या भाजी आणायला जाता तेव्हा घरातील लहान मुलं ही भाजी खाण्यास नकार देतात. शेवग्याच्या पानांची देखील भाजी केली जाते. या भाजीला इंग्रजी ड्रम स्टीक म्हणतात या भाजीला जगातील सर्वात शक्तीशाली भाजी म्हटले जाते. कारण यात पोषक तत्व भरपूर असतात. ज्या भाजीला आपण नाक मुरडतो ती भाजी इतकी हायली पोषक आहे की तुमचे सांधे दुखत असतील तर शेवग्याच्या शेंगाचे कालवण किंवा सुखी भाजी बनवून खायला सुरुवात करा. तुमची गुडघे दुखी लगेच थांबेल. अनेक महागडी सप्लिमेंट्स आणि विटामिन्समध्ये जेवढी पोषक तत्वं मिळत नाहीत. तेवढी शेवग्यात असतात. म्हणूनच तर त्याला सुपरफूड म्हटले जाते. ..
शेवग्याचे जबरदस्त फायदे
शेवग्याचे फळात आणि पानात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयरन असते. जे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मोठा स्रोत ठरू शकतो.
या शेवगा भाजीत विटामिन C, A आणि एंटीऑक्सीडेंट्स असते, त्यामुळे शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता वाढत असते.
संशोधनात स्पष्ट झाले आहे की तुमची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. ही भाजी डायबिटिक लोकांसाठी खूपच फायदेशीर असते.
या भाजीत फायबरचे प्रमाण मोठे असते, जी पचनयंत्रणेला मजबूत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्येला दूर करते
या शेवग्याच्या भाजीत कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते जे हडांच्या आरोग्यासाठी अत्यंत अतावश्यक असते.
हेही वाचा – भाजप महिला मोर्चाचा चौंडीला विशेष भेट दौरा
या भाजीला पाहून लोक नाक का मुरडतात?
शेवगा भाजी अनेकांना माहीती नसते परंतू प.महाराष्ट्रात खूप खाल्ली जाते.
अनेकांना या भाजीच्या रेसिपी माहिती नाहीत किंवा शिजवण्याची पद्धती माहीती नाहीत.
काही लोक याच्या आकारामुळे चिडतात. त्यांना ही रानटी वनस्पती वाटते.
या भाजीला गावातील भाजी समजून ती काही कामाची नाही असे अनेकांना वाटते.
शेवग्याच्या भाजीला कसे शिजवता येते हा याची माहीती
सांबार किंवा कालवण, भाजी बनवून खाता येते..
पानांचे सूप किंवा चहा बनवून खाता येते.
शेवग्याच्या पानांची पावडरीला स्मूदी वा भाजीत मिक्स करुन खा..
शेवगा एक अशी भाजी आहे त्यात साधेपणात मोठी ताकद लपलेली आहे. हे केवळ हेल्दी फूड नसून शरीराच्या संपूर्ण विकासासाठी वरदान आहे. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही बाजारात जाल तेव्हा शेवग्याच्या शेंगा आणायला विसरु नका. तुमच्या शरीराला ताकद येण्यासाठी ही असली हिरो ठरु शकते.