पुण्यातील वेदांता सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. सोमनाथ धोंडे
सचिवपदी स्नेहा राव, खजिनदारपदी प्रमोद भोसले यांची निवड

पुणे : वेदांता सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत, जिल्हा सहकारी कार्यालयाने नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली पारदर्शक व निर्भय निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये डॉ. सोमनाथ बाबाराव धोंडे यांची अध्यक्ष, श्रीमती स्नेहा राव यांची सचिव, आणि श्री. प्रमोद बापू भोसले यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली आहे.
सोसायटीच्या रहिवाशांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना व कार्यकारी मंडळातील सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना, अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे यांनी सोसायटीतील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, वेदांत सोसायटीच्या मूलभूत मूल्यांचे पालन करत एकता, विकास आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच…
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ? उद्याच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष
नवीन कार्यकारिणी सोसायटीच्या सर्व रहिवाशांच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी सकारात्मक बदल घडवण्यास तत्पर आहे. त्यांचे नेतृत्व समरसता वाढवून संपूर्ण सोसायटीच्या विकासात मोलाचा वाटा उचलेल, अशी अपेक्षा आहे.
नवनिर्वाचित व्यवस्थापन समिती (२०२५-२०२९) पदाधिकारी:
अध्यक्ष: डॉ. सोमनाथ बाबाराव धोंडे
खजिनदार: श्री. प्रमोद बापू भोसले
सचिव: श्रीमती स्नेहा राव
संचालक मंडळ:
श्री. विनायक दिनकर कदम
श्री. सरजेराव दगडू घाडगे
श्री. पराग गोविंदराव रुद्रवार
श्री. मयूर मच्छिंद्र वाघमारे
श्री. निखिल नरेंद्र मुळे
श्री. अमोल सतीशराव कुलकर्णी
श्री. मदन गुणवंतराव पाटील
श्री. सुमंत जगदीशचंद्र देशपांडे
श्री. शांतनू अबासाहेब देशमुख
श्री. अतुल जैन
श्री. आशिष जैन
श्रीमती निती पाठक
श्रीमती श्रद्धा मेश्राम
सामूहिक प्रयत्नांतून रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्याचा आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा निर्धार या नवीन नेतृत्वाने व्यक्त केला आहे. वेदांत सोसायटी आगामी कार्यकाळात सर्वांगीण विकास आणि सामाजिक ऐक्य यांसाठी कार्यरत राहील, अशी अपेक्षा आहे.