टेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेला मुदतवाढ

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) च्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणे, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगतीसह ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना बियाणे, खते, कृषी अवजारे व इतर गरजांसाठी निधी सहज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

मार्च-एप्रिल 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 7.75 कोटी सक्रिय खाती होती आणि एकूण 9.81 लाख कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. यावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाची आहे, हे दिसून येते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेत कोणते बदल केले?
यंदाच्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड योजनेत कर्जाची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळेल आणि डिजिटल आर्थिक समावेशना देखील चालना मिळेल.

किसान क्रेडिट कार्ड कसे कार्य करते?
किसान क्रेडिट कार्डमध्ये पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) आणि इंटरनॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर (IIN) असतो. हे मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड म्हणून काम करते.

आता शेतकरी ATM मधून सहज पैसे काढण्यासाठी या कार्डचा वापर करू शकतील, ज्यामुळे गरजेच्या वेळी सहज कर्ज उपलब्ध होईल. सुधारित व्याज अनुदान कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आता पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.

हेही वाचा –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ? उद्याच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष

अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेला मुदतवाढ
यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ 7.7 कोटी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. याचा फायदा विशेषतः लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे, तसेच पशुपालन व मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे नवे फायदे
अर्थसंकल्प 2025 नुसार अतिरिक्त 1 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणण्याची सरकारची योजना आहे. याचा फायदा आतापर्यंत कर्ज आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही होणार आहे.

किसान क्रेडिट कार्डवर सबसिडी
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सवलतीचा व्याजदर 7 टक्के आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्याला 3 टक्के व्याज अनुदान मिळते, ज्यामुळे अंतिम व्याज दर 4 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

मात्र, तीन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर विविध बँकांचे व्याजदर लागू असतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button