नावाडीने महाकुंभमध्ये 45 दिवसात कमावले 23 लाख रुपये
महाकुंभ २०२५ साठ कोटीहून अधिक भाविकांची संगम तटावर पाण्यात आस्थापूर्वक डुबकी

राष्ट्रीय : महाकुंभचे समारोप झाला आहे. महाकुंभ २०२५ नंतर आता पुढील सिंहस्थ कुंभ मेळा २०२८ मध्ये मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये होणार आहे. महाकुंभ २०२५ मध्ये साठ कोटीहून अधिक भाविकांनी संगम तटावर पाण्यात आस्थापूर्वक डुबकी मारली आहे. यंदा महाकुंभला विशेष मानाचे स्थान होते. या योग कित्येक वर्षांनी आला होता. त्यामुळे यंदा अधिकच गर्दी होती. या महाकुंभ मेलाने स्थानिकांना जबरदस्त रोजगार मिळाला आहे. अनेक लोक तर नवनवीन आयडिया लावून अक्षरश: लखपती झाले आहेत.परंतू एका नावाड्याची चर्चा संपूर्ण उत्तर प्रदेशात होत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील नावाड्याच्या यशाचा सन्मान करीत कौतूक केले आहे. कारण या नावाड्याने श्रद्धाळूंना आपल्या नावेतून फिरवून लाखो रुपयांची कमाई केली आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत या नावाड्याच्या कुटुंबाच्या यशाची कहाणी सांगितली आहे. या नावाड्याच्या कुटुंबाने संपूर्ण महाकुंभमध्ये ४५ दिवसात २३ लाख रुपयांची कमाई केली आहे, दररोज हा नावाडी ५० ते ५२ हजार रुपये कमावित होता.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ? उद्याच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष
देशाचा सन्मान वाढला
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या नावाड्याचे कौतूक करताना आमचे सरकार सबका साथ आणि सबका विकासाच्या धोरणावर चालले आहे. त्यांनी सांगितले की ४५ दिवस भरलेल्या महाकुंभमध्ये संपूर्ण जगात भारताच्या संस्कृतीचा ठसा उमठवला आहे. यामुळे केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशाचा सन्मान वाढला आहे.
3.5 लाख कोटी रुपयांची कमाई
महाकुंभच्या यशस्वी आयोजनाचा डंका संपूर्ण जगात अनेक वर्षांपर्यंत ऐकायला येणार आहे. कुंभ आयोजनात आमची केवळ आध्यात्मिक भूक भागली नाही तर आमच्या अर्थव्यवस्थेला देखील उभारी मिळाली आहे. महाकुंभातून साडे तीन लाख कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
66 कोटी भक्तांची डुबकी
महाकुंभमध्ये अनेक देशातील संत समाज आणि भाविक आले होते. सर्वजण महाकुंभची भव्यता आणि दिव्यता पाहून आश्चर्यचकीत झाले होते. महाकुंभ आमच्यासाठी एक शिवधनुष्य होते ते आम्ही यशस्वीपणे पेलले. ६६ कोटी भक्तांनी महाकुंभ दरम्यान श्रद्धेची डुबकी लावून पवित्र गंगा स्नानाचा आनंद घेतला. आणि सुरक्षित आपआपल्या घरी परतले. या भाविकात ३३ कोटी महिलांचा सहभाग होता.