breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे फेस्टिव्हलचे १३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा ३६ वे वर्ष साजरे करत असून, यंदा याचे उद्घाटन शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे होणार आहे. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

छत्रपती खा. शाहू महाराज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, विधानपरिषद काँग्रेस गटनेते सतेज पाटील, खा. मेधा कुलकर्णी , खा. सुनेत्रा पवार आणि खा. इम्रान प्रतापगढी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

हेही वाचा       –      ‘पवारसाहेब, तुमसे बैर नहीं, समरजित तुम्हारी खैर नहीं’; हसन मुश्रीफांचा पलटवार 

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचलनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील हे याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील.

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पर्यटन संचलनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणेच्या अध्यक्षा आबेदा इनामदार, डॉ. सतीश देसाई यावेळी उपस्थित होते.

पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकमान्य सभागृह (केसरी वाडा) येथे होतील. तसेच येरवडा गोल्फ क्लब, महाराष्ट्र मंडळ – टिळक मार्ग, वस्ताद लहूजी साळवे स्टेडीयम, भवानी पेठ आणि कोंढवा येथील म.न.पा मैदान येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे.

फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना शनिवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि दीपाली भोसले यांच्या हस्ते होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button