TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

आरोग्य सेवा रुग्णकेंद्री करण्यास प्राधान्य

पुणे : आरोग्य सेवा रुग्णकेंद्री करण्यासाठी माहितीवर (डेटा) आधारित निर्णय घेणे आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख आरोग्य व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे मत आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.आरोग्य सेवा आयुक्त पदाचा कार्यभार घेतल्यानंतर मुंढे यांनी पुणे येथील आरोग्य सेवा विभाग प्रमुखांची बैठक घेतली आणि मार्गदर्शन केले. तुकाराम मुंढे म्हणाले, आरोग्यसेवांविषयक माहिती अद्ययावत ठेवून त्यांचा वापर नियोजन आणि संस्थांच्या विकासासाठी करणे, ऋतूनिहाय आरोग्य सेवांचे नियोजन करणे, साथरोगांवर नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांशी समन्वय आवश्यक आहे. जिल्हा आणि गाव पातळीवरील संस्थांशी चांगला संवाद ठेवून दैनंदिन आढावा घेतला जावा अशा सूचनाही मुंढे यांनी या वेळी केल्या.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, आरोग्य सेवेतील घटक, आरोग्य माहिती प्रणाली, आवश्यक असणाऱ्या औषधांची उपलब्धता, आरोग्य प्रणाली वित्तपुरवठा, नेतृत्व आणि शासन या सहा घटकांवर भर देण्याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. या वेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि पुणे येथील सर्व विभाग प्रमुख, सहायक संचालक आणि स्वयंसेवी संस्थांचे सल्लागार उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button